यावलमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून मतदान जनजागृती

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज यावलमध्ये  विविध क्षेत्रातील कार्यालयामध्ये (स्विप) अंतर्गत जनजागृती रॅली व प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये ह भ प संचित कोळी महाराज सरस्वती विद्यामंदिर यावल यांनी मतदानाच्या संदर्भात कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. याप्रसंगी यावल शहरातील शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी होते.

कार्यक्रमाला प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटशिक्षणाधिकारी तथा मतदान जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी विश्वनाथजी धनके, निवासी नायब तहसीलदार विनंते साहेब,  रशीद तडवी, मुख्याध्यापक गजानन कुलकर्णी, मुख्याध्यापक एम के पाटील, ननावरे सर, काटकर सर, केंद्रप्रमुख शाकीर दादा व यावल शहरातील शिक्षकांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम गावातून रॅली काढून यावल बस स्थानक येथे कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कीर्तनाच्या माध्यमातून मतदानासाठी  नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. डॉ. नरेंद्र महाले सरस्वती विद्यामंदिर यावल व त्यांचे सहकारी विद्यार्थी यांनी कीर्तनामध्ये सहभाग घेऊन उत्तम प्रबोधनाचे कार्य केले.  बस स्थानकात  विविध गावातून आलेले नागरिक मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यांची या कीर्तनाला खूप मोठ्या प्रमाणात दाद मिळाली.

तहसीलदार नाझीरकर यांनी मतदानाचे कार्य पवित्र कार्य आहे व यासाठी सर्वांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवा या संदर्भात मतदारांना मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी धनके साहेब यांनी विद्यार्थ्यांना आपण देखील प्रबोधनाच्या या कार्यामध्ये सहभाग घेऊन, आपल्याला शक्य असेल तितके मतदानासाठी आपल्या गावातील नातेवाईकांना, मित्रमंडळींना, घरातील सदस्यांना ज्यांना मतदानाचा हक्क आहे त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचे आहे. या संदर्भात मतदारांना विशेष आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र महाले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक एम के पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.