निंबादेवी जंगलात अवैध वृक्षतोड; गुन्हा दाखल

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड माफियाच्या विरूद्ध वनविभागाच्या कार्यवाहीचे धाडसत्र सुरू असुन, यावल पश्चिम वन क्षेत्राच्या सामूहिक पथक हे गस्त करीत असताना नाल्यात अवैध्यरित्या खैर जातीचे वृक्षतोड मिळून आले आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पश्चिम क्षेत्राच्या वन विभागाचे पथक सामुहिकरित्या गस्तीवर असतांना त्यांना दि. १ एप्रिल रोजी निंबादेवी जंगल परिसरात अवैध्यरित्या खैर जातीच्या वृक्षाची तोड करून टाकलेले लाकुड बेवारस अवस्थेत दिसुन आलेत. या वेळी वन विभागाच्या कर्मचारी यांनी आजूबाजूस फिरून पाहणी केली असता त्या ठिकाणी मात्र आरोपी मिळून आले नाही.

सदरील मुद्देमाल मोजमाप केले असता वृक्षाची खैर जाती असुन त्याची संख्या नग ५१ घन मिटर असून, एकुण किंमत २५५८४ इतकी असून, वनरक्षक निंबादेवी यांनी प्र. रि. क्र. ४ / २०२४ दिनांक ०१ /०४/२०२४  जारी केला. सदरील मुद्देमाल खाजगी वाहनाने वाहतूक करून मुख्य् विक्री केंद्र यावल येथे ताबा पावतीने जमा केले. सदर  गुन्हे प्रकरणावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ / १ / अ,,फ़् अन्वये अज्ञात व्यक्ति विरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

 

सदरची कार्यवाहीत वनक्षेत्र यावल पश्चिम क्षेत्राच्या पथकात सहभाग घेतला.  निनु सोमराज वनसंरक्षक धुळे प्रादेशिक , जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव, राजेंद्र  सादगिर विभागीय वनअधिकारी (दक्षता) धुळे, प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्प यावल, पश्चिम वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल यावल सुनिल भिलावे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल विजय बोराडे हे करीत आहेत.

 

या कार्यवाहित वनपाल विजय बोराडे, विपुल पाटील, वनरक्षक अक्षय रोकडे, हनुमंत सोनवणे, सुधीर पटणे, चेतन शेलार, अशोक राठोड व रोपवन संरक्षण मजूर, फायर वॉचर सहभागी होते. वनक्षेत्रपाल यावल पश्चिम ( प्रा.) यावल वनविभाग जळगाव यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच   लाकूड वाहतूक संबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री  १९२६ या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.