डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कारांचे 13 रोजी वितरण

0

केशवस्मृती सेवा संस्था, जनता सहकारी बँकेचा उपक्रम
जळगाव ;- केशवस्मृती सेवा संस्था समूह व जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे वितरण दि. 13 एप्रिल रोजी होणार असून यावर्षी तीन संस्थांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती समूहाचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर व बँकेचे अध्यक्ष सतिष मदाने यांनी दिली.
केशवस्मृती सेवा संस्था प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने डॉ. आचार्य अविनाशी पुरस्कार देत असते. सेवा व सामाजिक क्षेत्रातील विविध घटकांच्या उत्थानाचे कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात येत असते. दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावर्षी पुणे जिल्ह्यातील पाबळ येथील विज्ञान आश्रम, मुंबर्इ येथील रामचंद्र प्रतिष्ठान व यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील दिलासा संस्थेचा गौरव करण्यात येणार आहे.

बेरोजगारीवर समूह करणार काम
जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता केशवस्मृती सेवा समूह काम करणार असल्याची माहिती भरत अमळकर यांनी दिली. श्री. अमळकर म्हणाले की, समाजात सौख्य नांदावे, विविध घटकांचे जीवनमान उंचावे यासाठी बेरोजगारीवर काम करण्यासाठी समूहाने पुढाकार घेतला आहे. निरोगी बेरोजगारांची सेवा आणि कृषी रोजगार यावर आगामी काळात काम करण्यात येणार आहे. समाजाची मदत घेवून हे अभियान हाती घेण्यात आले असून यातून बेरोजगारीवर नक्कीच मात होर्इल असा विश्वास भरत अमळकर यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.