धक्कादायक; यावलमध्ये आढळले ९ महिन्यांचे अर्धवट मृत बाळ

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील सातोद गाव शिवारात प्राण्यांनी खाल्लेले अर्धवट नऊ महिन्याच्या बाळाचा मृतदेह आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावल पोलिसांनी तात्काळ गावात जाऊन त्या बाळाचे अर्धवट अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला आहे.

संपूर्ण माहिती अशी की, यावल तालुक्यातील सातोद येथील इंदिरानगर परिसरात मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी यांना साफसफाई करतांना प्राण्यांनी खाल्लेले बाळ आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाचे अर्धे मृत शरीर ताब्यात घेतले. सदरचे बाळ कुणाच्या तरी अनैतिक संबंधातून जन्माला आले असावे, समाजात बदनामी होईल या भीतीपोटी या बाळास अशा प्रकारे जन्म देऊन बेवारस चिडून दिले असावे, असा अंदाज वुत्क्त केला जात आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हॅड कॉन्सटेबल राजेन्द्र पवार व पोलीसांनी तपासणीला सुरुवात केली आहे. यावल पोलीस ठाण्यात संबंधित बाळाच्या मृत्यूस कारणीभूत अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.