प्रवाशांना भुर्दंड.. ऐन दिवाळीत एसटीची भाडेवाढ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

ऐन दिवाळीत प्रवाशांना मोठा भूर्दंड बसणार आहे. कारण एसटी महामंडळाने येत्या ८ ते २७ नोव्हेंबर दरम्यान १० टक्के हंगामी प्रवास भाडेवाढ केली आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांना ट्रॅव्हल्स बरोबरच एसटीच्या अतिरिक्त भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. जळगाव ते पुण्यासाठी पूर्वी प्रवाशांना ६०५ रुपये मोजावे लागायचे. आता हे भाडे ६७० रुपये होईल.

 

एसटी महामंडळाने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार या दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच ८ नोव्हेंबरपासून ते २७ नोव्हेंबरपर्यत ही भाडेवाढ लागू असणार आहे. गर्दीच्या हंगामात भाडेवाढ अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला दिला असून ही भाडेवाढ करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.