महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत आढळल्याने खळबळ…

0

 

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) लोकशाही न्युज नेटवर्क;

तालुक्यातील कुंड या गावालगत एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. सदर महिलेचा मृतदेह हा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून फेकण्यात आल्याने परिसर हादरला असून एकच खळबळ उडाली आहे. कुंड गावा जवळ पूर्णा नदीच्या पात्रात, मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूला आज सकाळी हा मृतदेह आढळून आला.

अतिशय क्रूर पद्धतीने हत्या केल्यानंतर महिलेचा मृतदेह हा जाड प्लास्टिकच्या कॅरीबॅग मध्ये भरून तेथे टाकण्यात आला असून डोक्याला जबर मार लागला आहे. संबंधित महिलेची ओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी गाठून पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह हा क्रेन च्या साहाय्याने काढला. याप्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आलेला आहे. तसेच पोलिसांनी ओळख पटविण्या साठी जनतेला आव्हान केले आहे. या वेळी मुक्ताईनगर पोलीस कर्मचारी व कुंड येथील तरुणांनी सहकार्य केले. तसेच पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे आणि पोलीस हवालदार धर्मेंद्र ठाकुर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.