बापरे ! एकाच वेळी 9 बाळांना जन्म, अनोखा विश्वविक्रम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल सोशल मीडियावर (Social media) अनेक थक्क करणाऱ्या घटना व्हायरल (Viral News)  होतात. आपण ऐकलं असेल एखाद्या महिलेने दोन किंवा तीन बाळ म्हणजेच जुळ्या बाळांना जन्म दिला असेल. पण आपण हे ऐकलंय का ? चक्क एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिलाय ! तेही आईसह नऊ बाळ सुखरूप आहे. कदाचित तुमचा विश्वास देखील बसणार नाही, पण हे खरं आहे.

नोनूप्लेट्स म्हणजे काय ?

पश्चिम आफ्रिकन (Africa) देशांपैकी माली या देशात 26 वर्षांच्या हलीमा सिसे या महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला होता. हलिमाने 5 मे 2021 ला कॅसाब्लांका इथे 5 मुली आणि 4 मुलांना जन्म दिला होता. आता ही मुले आणि आई सुखरुप घरी पोहचली आहे. याआधीही असे 9 बाळांना जन्म देण्याचे प्रकरणे अनेकदा समोर आले आहेत. यालाच नोनूप्लेट्स (Nonuplets) असंही म्हणतात.

गिनीज बुकमध्ये नोंद

मात्र अशा प्रकारे 9 मुलांचा जन्म झाला, तर त्या मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. याआधीच्या अशा घटनांमध्ये सर्वच्या सर्व मुलं जगू शकली नव्हती. मात्र हलिमाच्या बाबतीत असे घडले नाही. तिची सर्व मुले जगली म्हणून हा जागतिक विक्रम बनला आहे. गिनीज बुकमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.

10 डॉक्टर, 25 पॅरामेडिक उपस्थित

मिळालेल्या माहितीनुसार, हलिमा 25 आठवड्यांची गरोदर होती तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 30 आठवड्यांनंतर तिची सिझेरियन डिलेव्हरी करण्यात आली तेव्हा तिथे तब्बल 10 डॉक्टर अन् 25 पॅरामेडिक उपस्थित होते. नऊ मुलं झाल्याने त्यांचे वजन कमी आणि प्रतिकारशक्ती कमी होती. त्यामुळे त्यांना दक्षता कक्षात ठेवण्यात आलं होतं. ही अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे की, प्रसूतीमधील मुलं सुखरुप आहे. त्यामुळे एकाच वेळी 9 मुलांना सुरक्षितरीत्या जन्म देण्याचा हा पहिलाच वर्ल्ड रेकॉर्ड म्हणावा. म्हणून सध्या ही घटना सोशल मीडियावर तुफान चर्चेत असून यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचे दिसून येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.