Windows 11 लॉन्च.. ‘हे’ आहेत टॉप फीचर्स; अशाप्रकारे करा डाउनलोड

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मायक्रोसॉफ्टने  भारतीय युजर्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टिम Windows 11 रोलआउट करायला सुरुवात केली असून Windows 10 युजर्सना प्रथम या नवीन ऑपरेटिंग सिस्टमचे अपडेट मिळेल. यासह, नवीन लाँच केलेल्या लॅपटॉपमध्ये WIndows 11 ला सपोर्ट असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, कंपनीने Windows 11 डिव्हाइसेस पूर्व-स्थापित करण्यासाठी Asus, HP, Lenovo, Acer आणि Dell सोबत भागीदारी केली आहे. मायक्रोसॉफ्ट नुसार, Windows 11 डाउनलोड आणि स्थापित केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर परवान्याच्या अटी स्वीकाराव्या लागतील. त्यानंतर डाउनलोड प्रक्रिया सुरू होईल.

टॉप फीचर्स

मायक्रोसॉफ्टची नवीन Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम नवीन यूजर इंटरफेससह येते. यात अगदी नवीन विंडोज स्टोअर, सेंटर टास्कबार आणि स्टार्ट मेनू बटण आहे. कॅलेंडर, हवामान आणि क्रीडा लीडरबोर्ड सारखे विजेट्स या नवीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये नवीन डिझाइनसह उपलब्ध असतील. याशिवाय, सिस्टम ट्रे, नोटिफिकेशन्स आणि क्विक अॅक्शन UI मध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, नवीन ऑपरेटिंग सिस्टमद्वारे युजर्स त्यांचे काम अधिक वेगाने करू शकतील.

पहिल्या पेक्षा जास्त वेगळ्या पद्धतीनं टास्कबार आता दिसणार आहे. यामध्ये अॅपचे आयकॉन्स आता एका कोपऱ्यात नाही तर मध्यभागी असणार आहेत. त्यामुळे आता हे फीचर युझर्ससाठी जास्त चांगलं असेल असा कंपनीचा दावा आहे. इतकच नाही तर स्मार्ट मेनू देखील यामध्ये असणार आहे.

याच सोबत आपल्याला जस मोबाईलमध्ये एकावेळी मल्टीविंडो वापरता येतात तशाच पद्धतीनं आता विंडोज 11मध्ये एकपेक्षा जास्त विंडो वापरता येणार आहेत. त्यामुळे याचा फायदा तरुणांना, व्यवसायिकांना तसेच मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. तुमचा लॅपटॉप जर टच स्क्रीन असेल तर तुम्ही विंडोमध्ये कीबोर्डशिवाय देखील अगदी सहजपणे काम करू शकणार आहात.

 Windows 11 अशाप्रकारे करा डाउनलोड

– अपग्रेड करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा लॅपटॉप किंवा कंप्यूटर या अपडेटसाठी पात्र आहे कि नाही ते बघा.

– यासाठी Microsoft चे अधिकृत PC Health Check App डाउनलोड करावे लागेल.

– त्यानंतर Windows Key + I एक साथ प्रेस करून सेटिंगमध्ये जा. त्यानंतर Update & Security वर क्लिक करा.

– आता डावीकडे Windows 11 अपडेट चेक करा. त्यानंतर Check for Updates बटणवर क्लिक करा.

– जर तुमचा PC पात्र असेल तर तुम्हाला upgrade to Windows 11 is ready असा मेसेज मिळेल.

– आता Download and install वर क्लिक करा. असे केल्यावर डाउनलोडिंग सुरु होईल.

– डाउनलोड आणि इन्स्टॉल झाल्यावर तुमचा पीसी विंडोज 11 वर रिबूट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.