राज्यात हुडहुडी वाढणार ! उत्तर महाराष्ट्रात पारा घसरला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मागील काही दिवसांपासून राज्यात कधी थंडी तर कधी पाऊस असे वातावरण होते. आता राज्यात गार वाऱ्यासह थंडीला सुरुवात झाली असून विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रात तापमानात घसरण झाली आहे. या आठवड्यात थंडी कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  अग्नेय अरबी समुद्राला जोडून भारतीय उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत.या वाऱ्यामध्ये आर्दता असल्याने काठी ठिकाणी धुके पडणार असल्याचा अंदाज आहे. या आठवड्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी राज्यातील किमान तापमानातील घट नोंदवली आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. पुढील आठवड्यात देशासह राज्यात तापमानात काही प्रमाणात घट होणार आहे. सध्या उत्तर भरातात मोठ्या प्रमाणात गारठा वाढला आहे. तर काही राज्यात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.