राज्यात आज ‘या’ ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

राज्यात काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. यामुळे शेतकरी वर्ग पावसाच्या मोठ्या प्रतीक्षेत आहे. याच संदर्भात हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकण विभागामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी बरसणार आहे. राज्यामध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठी मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हे हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असून पूर्व टोक हे गोरखपुर, दरभंगा, बालुरघाट आणि मणिपूर भागापर्यंत सक्रिय झाले आहे. तसेच, तमिळनाडू राज्याच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत चक्रकार वारे वाहत आहे. तसेच, कर्नाटक राज्यापासून ते कोमोरीन भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.