बोटीत शस्त्रास्त्र आढळल्याने खळबळ; या जिल्ह्यात हायअलर्ट

0

 

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सकाळच्या सुमारास हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ एक संशयास्पद बोट आढळून आली होती. सुरुवातीला ही बोट स्थानिक मच्छिमारांची असल्याचं लोकांना वाटलं, पण या बोटीत शस्त्रास्त्र आढळल्याने एकच खळबळ उडाली. या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहे. या घटनेची तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.

घटनेची माहिती मिळताच हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर पोलिसांनी धाव घेतली. संशयास्पद बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. डी वाय एस पी. तहसीलदार एसआरटी टीम अध्यक्ष सुहेब हमदुले आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाल आहे. ही बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. बोटीची पाहणी केली जात आहे.

1992 – 93 मुंबई बॉम्बस्फोटात जे आरडीएक्स वापरण्यात आलं होतं, ते सुद्धा रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरवण्यात आलं होतं, आता पुन्हा एकदा संशयास्पद बोटीत शस्त्रास्त्र सापडली आहेत, त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात हायअलर्ट देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.