चोपड्यात जिवंत काडतूस… पोलिसांची मोठी कारवाई…

0

 

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

चोपडा शहर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. १७ रोजी रात्री चोपडा – शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैध शस्त्र खरेदी विक्री करतांना तब्बल चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, यावेळी त्यांच्याजवळून ६ गावठी बनावटीचे कट्टे, ३० जिवंत काडतूस, ४ मोबाईल फोन व फोर्ड एंडेवेअर कंपनीचे चार चाकी वाहन असा एकूण रु. ३७,३७००० किमंतीच्या मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चोपडा ते शिरपुर रोडवर एस्सार पेट्रोलपंपाजवळ आरोपी नामे १) गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे वय २५ रा. ओगलेवाडी ता. कराड जि.सातारा २) मोहसीन हनिफ मुजावर वय ३० रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा ३) रिजवान रज्जाक नदाफ वय २३ रा. शिवाजी चौक, मलकापुर ता. कराड. जि. सातारा व ४) अक्षय दिलीप पाटील वय २८ रा.४५ रविवार पेठ, कराड जि.सातारा अशांनी अवैध शस्त्र खरेदी विक्री करणारा आरोपी सुरज विष्णु सांळुखे रा.कराड जि.सातारा याच्या सांगण्यावरुन आरोपी सागर सरदार (शिखलकर) रा. पारउमर्टी ता.वरला जि.बडवानी याच्या जवळून 6 गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच ३० पिवळया धातुचे जिवंत काडतुस हे विनापरवाना व बेकायदेशीर रित्या स्वतः जवळ बाळगून कोणास तरी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने चारही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे ताब्यातील १,२०,००० रुपये किंमतीचे ६ गावठी कट्टे, ३०हजार रुपये किंमतीचे ३० जिंवत काडतूस, ८७ हजार रुपये किमंतीचे ४ मोबाईल फोन व ३५ लाख रुपये किमतीची फोर्ड एन्डेव्हर कपंनीचे वाहन क्रंमाक MH 50 L 8181 या चार चाकी वाहनासह ३७,३७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व ६ ही आरोपी हे संगनमताने गुन्हा करतांना मिळुन आल्याने चोपडा शहर पोस्टे. भाग ५ गुरनं. 336/2022 भादंवि कलम 34 प्रमाणे आर्म ऍक्ट 3/25, 7/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक चोपडा विभाग कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.काँ. दिपक विसावे, पो.ना. संतोष पारधी, पो.ना. संदिप भोई, पो.काँ. शुभम पाटील, पो.काँ. प्रमोद पवार व पो.काँ. प्रकाश मथूरे आदिंच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.