पारोळ्यात पाणीपुरवठा नियोजनाचा अभाव, रात्री अवेळी सोडले पाणी

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा येथील महामार्ग क्रमांक ६ जवळच्या छत्रपती संभाजी नगर परिसरात पालिकेकडून शुक्रवारी (दि. २०) रोजी रात्री अक्षरशः एक वाजता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. पालिकेतील पाणीपुरवठा विभागाकडे पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याचे नागरिकांची झोप उडाली. रात्री उशिराने जागून नागरिकांना पाणी भरावे लागत आहे. दोन तास पाणीपुरवठा करून, देखील बरेच नागरिक पाण्यापासून वंचित राहिले. येथील पालिकेने पाणीपुरवठा करण्यासाठी शहराचे बारा झोन केले आहेत. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने सद्यःस्थितीत पालिकेकडून १० ते १२ दिवसातून पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान, चोरवाड रस्त्यालगत न्यू बालाजी नगर परिसरात नवीन पाईपलाईनचे काम सुरु आहे. यावेळी संजीवनी मेडिकल परिसरात ही पाईपलाईन फुटल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.