अरे देवा…दारूच्या नशेत चक्क गळ्यात गुंडाळला अजगर, पहा व्हिडिओ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दारूच्या नशेत अनेकदा लोक काय करतील,याच यांना भान नसत. परंतु नंतर मात्र त्या कृतूचा त्यांना चांगलाच पश्चाताप होतो. नशेच्या धुंदीत माणसाचं डोकं नीट काम करत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मद्यधुंद व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांच्याच अंगावर काटा येईल.

नेमकं प्रकरण काय?
केऱळच्या तिरुअनंतपुरम मधून हा धक्कादायक पारकर समोर आला आहे. दारूच्या नशेत एक व्यक्ती चक्क गळ्यात अजगर घेऊन फिरत होता. या व्यक्तीने एवढी दारू पिली होती की, त्याला समजतच नव्हतं की, तो त्याच्या गळ्यात मृत्यू घेऊन फिरत होता. फिरत फिरत हा मद्यधुंद व्यक्ती एका पेट्रोल पंपावर आला. पेट्रोल पम्पावरच्या कर्मचाऱ्यांना तो आपला फोटो काढण्याची विनंती करतो. या माणसाला कशाचीच जाणीव नव्हती.

पेट्रोलवरील कर्मचाऱ्याने वाचवला जीव
दारुच्या नशेत गळ्यात अजगर घेऊन फिरत असलेल्या या महान व्यक्तीच नाव चंद्रन आहे आणि तो केरळमधील कन्नूरचा रहिवासी आहे. हा व्यक्ती ज्या पेट्रोल पंपावर आला होता. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, त्याने याआधी कधीच सापाला हात लावला नव्हता. मात्र चंद्रनला अजगराशी झुंजताना पाहून त्याने ताबडतोब पोतं घेतलं आणि त्या व्यक्तीच्या मदतीला धावून गेला. त्याने अजगराची शेपटी पकडून त्याला मागे ओढलं, त्यानंतर अजगराने त्या माणसाचा गळा सोडला आणि तिथून निघून गेला. सेल्स पर्सनने सांगितलं की सुरुवातीला तो घाबरला होता, परंतु जेव्हा त्याने पाहिलं की त्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे तेव्हा त्याने कोणताही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी गेला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.