कांदिवलीतील इमारतीला भीषण आग, २ जणांचा होरपळून मृत्यू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील कांदिवली इथल्या विना संतूर इमारतीला दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली होई. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमंडळाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी युद्धपातळीवर आग नियंत्रणात आणली.
नेमकी आग कशामुळं लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील वीणा संतूर इमारतीला दुपारी १२.२७ वाजता ही आग लागली. सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीच्या बाजूला असलेल्या या इमारतीच्या ग्राऊंड आणि पहिला मजला अशा दोन मजल्यांवर हि आग पसरली होती.

दोन जणांचा होरपळून मृत्यू
सुरुवातीला या आगीत एक वृद्ध महिला आणि एक लहान मुलांसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. पण आता यात इतर दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.