बीएमडब्ल्यूची काच फोडून सुमारे १४ लाख रुपयांची रोकड लंपास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्नाटकच्या राजधानी बंगरुतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बीएमडब्ल्यू कारमधून सुमारे १४ लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

कर्नाटकची राजधानी बंगळुरुतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक बीएमडब्ल्यू कारमध्ये सुमारे १४ लाखांची रोकड चोरल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक कार रस्त्यात उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी दोन तरुण दुचाकीवरून कारजवळ येतात. एक तरुण खाली उतरतो आणि कारची काच फोडतो. यानंतर तो आत ठेवलेली १४ लाखांची बॅग घेऊन पळ काढतो. चोरीची ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत

ही घटना घडली तेव्हा अनेक लोक कारपासून काही मीटर अंतरावर उभे होते, परंतु कोणालाच त्याची कानोकान खबर झाली नाही. ज्या कारमधून ही चोरी झाली ती BMW X5 असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क लावलेले होते, त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.