धोपेश्वर पाणीपुरवठा योजनेची जळालेली मोटार तात्काळ ॲड.रावळ यांनी बदलविली

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मलकापूर शहराला श्री क्षेत्र धोपेश्वर येथून पूर्णा नदीतून पाणीपुरवठा होतो. तेथील 150 एचपीची मोटर पंप खराब झाल्यामुळे ताबडतोब कर्मचारी लावून नगराध्यक्ष ॲड.हरीश रावळ यांनी स्वतःच्या देखरेखी खाली ती बदलून दुसरी 150 एचपीची मोटर पंप बसून पाणीपुरवठा सुरळीत केला. मलकापूर शहराला श्री क्षेत्र धोपेश्वर येथून पूर्णा नदीतून पाणीपुरवठा होतो सध्या हातनुर धरण हे पूर्ण भरलेले असून, त्याचे बॅक वॉटर म्हणजे पूर्णा नदीचे धोपेश्वर येथील पाणी हे 100% भरलेले आहे. परंतु विद्युत पुरवठा कमी-जास्त दाबामुळे झाल्याने 150 एचपीची मोटर पंप हे खराब झाली. दुसरी मोटर पंप स्वतः हरीश रावळ यांच्या देखरेखीखाली कर्मचारी फरीद खान, मोहन राठोड, चंदनशिव, सतीश ताकसाळे, शफिक भाई, नानूभाई या सर्व कर्मचाऱ्यांनी दोन दिवस अहोरात्र मेहनत करून दुसरी मोटर पंप बसवली व शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत केला.

Leave A Reply

Your email address will not be published.