धक्कादायक; संभाजीनगर ५०० कोटींचे कोकेन जप्त

0

संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

ललित पाटील प्रकरण गाजत असतांनाच छत्रपती संभाजीनगरमध्ये डीआरआयच्या पुणे पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने ५०० कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलंय. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, DRI च्या पुणे, मुंबई, आणि अहमदनगर टीमने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी कारवाई केली आहे. DRI च्या या कारवाईत छत्रपती संभाजीनगर शहरात कोट्यवधी रुपयांचे कोकेन सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कोकेनची किंमत तब्बल ५०० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे .

मात्र महसूल गुपचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप याला दुजोरा दिला नाहीये. या कोट्यवधी रुपयांच्या कोकेनसोबत दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई, नाशिकनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात कोकेन सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील मोठे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.