वाघूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ, पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे जलसाठा वाढून जळगावकरांच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी मिटला आहे. एकूण तेरा माध्यम, तीन मोठ्या प्रकल्पात मिळून एकूण ८९.८९ टक्के जलसाठा जिल्ह्यात आहे. यामुळे खरीप हंगामातील कापूस व रब्बी हंगाम चांगला येणार आहे. सिंचनासाठी मोठी सोया यामुळे झाली आहे. वाघे धारण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असल्यानं जळगाव शहर, जामनेर व तालुक्यातील पाणी टंचाई मिटली आहे. हतनूर धरणात ७५ टक्के साठा आहे. हतनूर परिसरातील पाण्या काठची गावे, रावेर, यावल, भुसावळ, परिसरातील पाणी टंचाई मिटली आहे. गिरणा धरणात ५६ टक्के पाणी आहे. अजून पावसाची शक्यता आहे.

यमुने गिरणा पट्ट्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, या तालुक्यात त्याचा लाभ होणार आहे. खरीप हंगामातील जिरायती कापसाचे नुकसान झाले असले तरी आहे त्या पिकांचे चांगले उत्पादन येणार आहे. सोबत रब्बी हंगाम चांगला येण्याची आशा निर्माण झाली आहे.

धरणातील जलसाठा खालीलप्रमाणे (टक्के)

धरणाचे नाव व गतवर्षीचा साठा

हतनूर ७४.९०.२०

गिरणा ५५.३८.१००

वाघूर ९३.५७ ८९.६६

जिल्ह्यातील अंभोरा, मंगरूळ, सुकी, तोंडापूर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर मोर ९५.५८, अग्नावती ९.२८, हिवरा २३.७९, बहुळा ५०.८५, अंजनी ८२.७४, गुळ ८०.६६, भोकरबारी २१.७६, बोरी २८.३२, मन्याड ४०.२७ टक्के असा पाणीसाठा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.