व्हॉईस ऑफ मीडियाचे आंदोलन जळगाव जिल्ह्यात यशस्वी….

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलनास जळगाव जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. जळगाव शहरासह विविध तालुक्यात पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन गुरुवारी करण्यात आले. मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय तसेच तालुका तहसीलदार यांना देण्यात आले.

जळगाव येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे निवासी उपजिल्हाधकारी भारदे यांना देण्यात आले, त्यावेळी संघटनेचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल,  कार्याध्यक्ष विकास भदाने, सचिव विजय वाघमारे,  ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक, ज्ञानेश्वर वाघ, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नवाल आदी उपस्थित होते.

प्रमुख सहा मागण्या संघटनेने शासनाकडे केल्या आहेत…

१) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा.

२) पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.

३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा.

४) पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.

५) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.

६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.

आमच्या मागण्या आपल्या मार्फत शासन स्तरावर पाठवाव्यात आणि आम्हाला तीव्र आंदोलन करण्याचे पाऊल उचलावे लागू नये, याची दक्षता घ्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.