विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील ३३ वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीने इतिहास घडविण्याची संधी होती.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट आपल्या वनडे कारकिर्दीतील शतक झळकावण्याचा अगदी जवळ पोहोचला होता, मात्र त्याचा मोठा विक्रम अवघ्या १२ धावांनी हुकला आहे. त्याचा शतकांचा रेकॉर्ड हुकला असला तरी त्याने सचिनचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

विराटने या सामन्यात ९४ चेंडूंच सामना करत ८८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार खेचले. त्यांचं शतक अवघ्या १२ धावांनी हुकलं. मात्र याच डावातील ३४ धावा पूर्ण करताच त्याने तेंडूलकरचा वनडे क्रिकेटमध्ये एकाच वेळेस सर्वाधिक वेळेस १००० धावा करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या सामन्यात येण्यापू्र्वी विराटने ९६६ धावा केल्या होत्या. तर ३४ धावा पूर्ण करताच त्याने १००० धावांचा पल्ला गाठला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.