भुसावळ येथे २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग

0

भुसावळ : शहरातील एका भागात राहणाऱ्या २० वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार मंगळवारी दि. १६ जानेवारी रोजी उघडकीस आला. याप्रकरणी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरामधील एका भागात २० वर्षीय महाविद्यालयीन तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे.

मंगळवार दि.१६ जानेवारी रोजी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा शशिकांत लक्ष्मण लोखंडे (वय ५१) याने तरूणीसोबत अश्लिल चाळे करीत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर रात्री १० वाजता पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी शशीकांत लक्ष्मण लोखंडे याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुपडा पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.