कर्जाची रक्कम फेडण्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

0

जळगाव ;– बॅँकेच्या कर्जाची फेड करण्याच्या कारणावरून राग आल्याने एकाने महिलेस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि,

जळगाव शहरातील एका परिसरात ४६ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी २६ मार्च रोजी रात्री ८ वाजता महिलेने श्रीकृष्ण तुकाराम मोंगडे रा. सोनी नगर, पिंप्राळात्या महिलेकडे आला होता. त्यावेळी महिलेने श्रीकृष्ण मेंगडे याला बँकेचे कर्ज फेडून टाक असे सांगितले. याचा राग आल्याने श्रीकृष्ण मेंगडे यांने महिलेलेा शिवीगाळ करून हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच महिलेची मुलगी आणि जावई यांना शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार २८ मार्च रोजी घडला / याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.