तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

0

जामनेर ;’- माझा व त्याचा सेल्फी काढलेला फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला ८ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास तिला दुचाकी वर बसवून आरोपी अमोल भागवत इंगळे आणि त्याचा मित्र अमोल पूर्ण नाव गाव माहित नाही. या दोघांनी तरुणीच्या अंगलट येऊन लज्जास्पद कृत्य करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्टेशनला आठ रोजी दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस नाईक गणि तडवी करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.