मतदार संघाच्या विकास कामांसाठी ४३ कोटींचा निधी मंजुर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पाचोरा – भडगाव मतदार संघात रस्ते काॅक्रेटिकरण, डांबरीकरण व अत्यावशक ठिकाणी पुलांची कामे करण्यासाठी डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात राज्यशासनाकडुन ४३ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असुन फेब्रुवारी-२०२४ मध्ये आचारसंहिता लागण्या अगोदर मतदार संघात ही विकास कामे सुरू होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी ९ डिसेंबर रोजी त्यांचे भडगाव रोडवरील “शिवालय” या निवासस्थानी पत्रकार परिषद घेवुन दिली.

आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परीषद प्रसंगी आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, ज्ञानेश्वर चौधरी, मा. जि. प. सदस्य पदममसिंग पाटील, सुनिल पाटील, किशोर बारवकर, प्रविण ब्राम्हणे, स्विय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थीत होते. यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटील म्हणाले की, पाचोरा तालूका हा दुष्काळ सदृष होता. त्यामुळे जलयुक्त शिवार, सलसंपदा व जलसंधारणासाठी २०० ते २५० कोटींची कामे मागील पाच वर्षात केल्यामुळे भुजल पातळी वाढल्याने शेतकर्‍यांना शेतीच्या पाण्याची अडचण आता येत नाही. मोठ्या प्रमाणात शेतीचा वापर रहिवासासाठी झाल्याने शेती व्यवसाय कमी झाला. मात्र उर्वरीत शेती बागायत झाल्याने शेतीला पाणी देण्यासाठी विजेच्या ट्रान्सफार्मरची मागणी वाढत आहे.

पाणी, विज, रस्ते ही व्यवस्था मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा परिसर रेल्वेच्या मुख्य मार्गावर असल्याने भविष्यात रेल्वेचा एखादा मोठा प्रकल्प आणण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीला जाईन भेट घेणार आहे. शहरातील रेल्वे लाईन पलिकडील भागात रस्ते काॅंक्रीटीकरण कामाचा बजेट १०० कोटींचा आहे. शहरालगत असलेल्या धार्मिक स्थळातील काकनबर्डी परिसर विकास कामासाठी १७ कोटींचा निधी मंजुर झाला असुन हे काम लवकरच सुरू होत आहे.

१७ कोटींचे उपजिल्हारूग्णालय वर्षभरात पाहण्यास मिळेल. व्यापारी भवन व आठवडे बाजारातील व्यापारी संकुलाचे काम सुरू झाले आहे. भडगाव शहरासाठी ११० कोटींची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्यात आहे. अशा मतदार संघातील शेकडो कोटींच्या विकास कामांची माहीती यावेळी आ. किशोर पाटील यांनी दिली. मतदार संघाच्या विकास कामासाठी ४३ कोटींचा निधी मंजुर करून दिल्याबद्दल आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व राज्यशासनाचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.