डॉक्टर महिलेच्या घरात शिरून शिवीगाळ व अश्लील कृत्य करणाऱ्या विरुद्ध गुन्हा

0

जामनेर ;- तालुक्यातील एका गावात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या 23 वर्षीय डॉक्टर महिलेच्या घरी जाऊन तिला अश्लील शिवीगाळ व तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या डॉक्टर महिला आरोपी शैलेंद्र सुकलाल सूर्यवंशी गुजर याने पाच डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास महिला डॉक्टरच्या घरात शिरून तिला अश्लील शिवीगाळ आणि तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी महिला डॉक्टरने 8 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पहूर पोलिस स्टेशनला धाव घेऊन आरोपी शैलेंद्र सूर्यवंशी याच्याविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.