तरुणीशी अश्लील चाळे धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा

0

जळगाव;-शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीच्या साधेपणाचा फायदा घेऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा व अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करून तिच्या वडिलांना खोट्या केस मध्ये अडकवेल व तिच्या भावांना गॅंग पाठवून मारून टाकेल अशी धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरात एका परिसरात राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीला आरोपी अक्षय अजय जयस्वाल वय 23 राहणार शिवाजीनगर याची तरुणीची ओळख निर्माण होऊन एक जून 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान वेळोवेळी अक्षय जयस्वाल यांनी तरुणीच्या साधेपणाचा फायदा घेऊन तिचा पाठलाग करून तिच्याशी अश्लील चाळे करून वडिलांना खोट्या केस मध्ये अडकवले आणि तुझ्या भावंडांना गॅंग पाठवून मारून टाकेन अशी धमकी दिल्या प्रकरणी तरुणीने जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला धाव घेऊन फिर्याद दिल्यानुसार अक्षय जयस्वाल याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.