ज्येष्ठ नगरसेवक विजय कोल्हे यांचे निधन…

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

माजी ज्येष्ठ नगरसेवक विजय पंडितराव कोल्हे यांचा आज निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
विजयबापू पंडितराव कोल्हे यांनी आपले वडील स्वातंत्र्यसैनिक पंडितराव कोल्हे यांच्या समाजसेवेचा वारसा समर्थपणे चालविला. ऐशीच्या दशकात तत्कालीन जळगाव नगरपालिकेपासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विजय बापू यांनी तब्बल ३५ ते ४० वर्षे नगरसेवकपद भूषविले. त्यांच्या सौभाग्यवती सिंधूताई कोल्हे यांना नगराध्यक्षपद तर चिरंजीव ललीत कोल्हे यांनी जळगाव नगरीचे महापौरपद भूषवले.
जळगावच्या औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणार्‍या रेमंडमधील कामगार युनियनवर देखील जवळपास ३० वर्षे त्यांचे वर्चस्व होते. काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव काम केले.

आज रात्री अल्पशा आजाराने विजयबापू कोल्हे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी एक वाजता अंत्यंस्कार करण्यात येणार आहे. ते माजी महापौर ललीत कोल्हे यांचे वडील होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विजयबापूंच्या निधनाने समाजाच्या सर्व स्तरांमधील शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.