आर.माधवनच्या मुलाची तुफान चर्चा रंगत आहे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेता माधवनने सर्वच प्रेक्षकांना आपल्या अभिनयच्या आणि टॅलेंच्या जोरावर सर्व रसिकप्रेक्षकांचे मन जिंकले त्याचप्रमाणे अभिनेता आर माधवन (R Madhavan) याचा मुलगा फक्त आई-वडिलांचं नाही तर, देशाचं नाव देखील मोठं करत आहे. वेदांत माधवन (vedaant madhavan) याने आतापर्यंत अनेक बक्षिस आपल्या नावावर केली आहे. आता वेदांत याने ‘खेलो इंडिया यूथ गेम्स 2023’ मध्ये एक दोन नाही तर, चक्क सात मेडल स्वतःच्या नावावर करत नवीन विक्रम रचला आहे. सध्या सर्वत्र आर माधवन याचा मुलगा वेदांत याची तुफान चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर आज प्रत्येक जण वेदांत याचं कौतुक करत त्याला शुभेच्छा देत आहेत. वेदांत याने मध्य प्रदेश याठिकाणी होत असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांवर स्वतःचं नाव नोंदवलं आहे.

मुलाने मिळवलेल्या यशाचा आनंद माधवन याने ट्विटरवर फोटो शेअर करत व्यक्त केला आहे. ट्रॉफी आणि पदकासह मुलगा वेदांत याचा फोटो शेअर करत माधवनने ट्विटमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता म्हणाला, ‘देवाच्या कृपेने १०० मीटरमध्ये सुवर्ण, २०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये सुवर्ण, ४०० मीटर आणि ८०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले.’ सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.