टिप्पर व आयशरची समोरासमोर धडक; मोताळा तालुक्यातील ३ जणांचा मृत्यू

0

मलकापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर तालसवाडा नजीक पुलावर टिप्पर व आयशरची समोरासमोर भिषण धडक झाली.ही धडक एवढी भिषण होती की, या धडकेत मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील 3 जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर बुलढाणा येथील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे.

कल्याण टोलच्या भरधाव वाहनाचा सलग तिसऱ्या दिवशी हा दुसरा अपघात असुन परवा घिर्णीनजीक मोटारसायकल ला धडक दिल्याने त्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली होती. तोच आज हा दुसरा अपघातही कल्याण टोलच्या चालका निष्काळजी मुळेच घडल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील आयशर क्रमांक (MH 48 j 0061) हे विटांचा माल घेवून मुक्ताईनगरकडे जात होते, दरम्यान आशयर व कल्याण टोलचा टिप्पर क्रमांक( MH 46 AF 2782) ची सकाळच्या सुमारास तालसवाडा पुलाजवळ समारोसमोर भिषण धडक झाली. या धडकेत आयशरच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला.घटनास्थळावरुन टिप्परचालकाने पोबारा केला. मात्र ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जेसीबीच्या साह्याने आयशरची कॅबीन तोडून मयत चालक राजु रतन चव्हाण, जिवन सुरेश राठोड व सुनिल ओंकार राठोड सर्व रा. मोहेगाव यांचा घटनास्थळी दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.अपघाताची माहिती मिळताच लोकनेते ॲड हरीश रावळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना आपल्या वाहनाद्वारे उपजिल्हा रुग्णालयात आणले. उपजिल्हा रुग्णालयात एकच स्ट्रेचर उपलब्ध असल्याने रावळ व सहकाऱ्यांनी जख्मींना उपचारार्थ खांद्यावर उचलून रुग्णालयात दाखल केले. जख्मींची परिस्थिती गंभीर असल्याने राम मलखंब राठोड यांच्यावर बुलढाणाच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातामध्ये मोहेगाव येथील तिघांचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.