शेंदुर्णी ता जामनेर,
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. पर्यावरण संवर्धन व अपारंपारिक ऊर्जा या विषयावर चित्र काढण्याचे सुचवलेले होते .त्यात अर्जुन राहुल अग्रवाल शेंदुर्णी व उन्नती पाटील पाचोरा याना राज्यातून द्वितीय क्रमांक मिळाला.
अर्जुन राहुल अग्रवाल शेंदुर्णी व उन्नती नितीन पाटील यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये रोख रक्कम ,विभागून ट्रॉफी व प्रमाणपत्र मुंबई येथे एका कार्यक्रमात देण्यात येणार आहे. दोन्ही विद्यार्थी हे निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील विद्यार्थी असून विजेत्यांचे अभिनंदन महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अंबलगन तसेच बाळासाहेब थिटे संचालक महानिर्मिती , निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन वैशाली सूर्यवंशी,, प्राचार्य गणेश राजपूत शिक्षक शैलेश कुलकर्णी, राजश्री पाटील ,शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक राजपूत यांनी केले आहे.

