वरणगावात अज्ञातांनी दुचाकी पेटवली

0

वरणगाव : शहरातील सिध्देश्वर नगर भागात घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञातांनी सोमवारी रात्री पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली असून या घटनेबाबत पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. शहराच्या सिध्देश्वर नगर भागात भुरटे चोरट्यांकडून चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत.
सोमवारी रात्री याच भागातील रहीवाशी शेख अकरम शेख अकील यांची (एम.एच.१९ डि. ८२५१) क्रमांकाची दुचाकी घरासमोर लावलेली असतांना, रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पेटवुन दिली. शेख यांनी दुचाकीला विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत दचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय भरत चौधरी यांच्या मागदर्शनाखाली पोहेकॉ नागेंद्र तायडे तपास करीत आहेत.

जाळपोळ व चोरीच्या घटना नित्याच्याच सिद्धेश्वर नगर भागातील नविन वसाहतीत अवैध धंद्याना ऊत आला आहे. या भागात जुगार, मटका यासह गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने अनेक जण व्यसनाधिन झाले आहे. किरकोळ कारणावरून जाळपोळ करण्याचे प्रकार नित्याचेच झाले असल्याने पोलीसांनी या भागाकडे विशेष लक्ष देवून उपद्रवींचा बंदोबस्त करण्याची मागणी सुज्ञ
नागरीकांमधन होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.