स्वच्छ भारत अभियान: वरणगाव नगरपरिषदेची उल्लेखनीय कामगिरी

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्वच्छ भारत अभियान 2023 मध्ये वरणगाव नगरपरिषदेची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारत सरकार द्वारा घोषित करण्यात आला आहे. सदर निकलामध्ये नगरपरिषद वरणगावने देशात 3970 पैकी 263 वा आणि देशाच्या पश्चिम विभागातील 5 राज्यातील 319 नगरपालिकापैकी 52 क्रमांक मिळविला आहे.

नगरपरिषद वरणगावला हागणदारी मुक्त शहर (ODF++) आणि कचरामुक्त शहर (GFC 1 स्टार) मानांकन प्राप्त करून सर्वांसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. यापूर्वी सुद्धा माझी वसुंधरा अभियाना 3.0  मध्ये नगर परिषद वरणगावने महाराष्ट्रात 24 वा क्रमांक मिळविला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, २०२२ च्या निकालानुसार देशात ५५१ व पश्चिम विभागात १७९ स्थानी असणाऱ्या वरणगाव नगरपरिषदेने मोठी उडी या स्वच्छ सर्वेक्षणात घेतल्याचे दिसून येते.

नगरपरिषद वरणगाव शहरातील प्रत्येक घरा घरातून कचरा संकलन केला जातो. त्या कचऱ्यावर घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, सुक्याला वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्यात येते. शहरात प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात येते. नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात येते. शहरातील नागरिकांना प्रदूषण, पर्यावरण स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन या विषयावर जनजागृती करण्यात येते.

वरणगाव नगरपरिषद स्वच्छ व सुंदर सार्वजनिक शौचालय सेवा नागरिकांना निःशुल्क  दिली जाते. या सारखे अनेक कामे, उपक्रम आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम केली जाते, त्या मुळेच हे यश नगरपरिषद वरणगाव मिळवू शकले असे नगरपरिषद वरणगाव मुख्याधिकारी समीर शेख यांनी सांगितले व त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि वरणगाव शहरातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.