वरणगावच्या मुख्य रस्त्याची वाहतूक कोंडी कधी सुटणार?, संतप्त नागरिकांचा सवाल

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातल्या बस स्थानक परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून वाहन चालकांचा बेशिस्तपणा दिसून येत आहे. वाटेल त्या ठिकाणी आपले वाहन उभे करण्यात येत आहे. त्यामुळे अवजड वाहनास जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. एवढेच नाही तर, पादचाऱ्यांना देखील या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भरपूर वेळेस वर्तमान पत्रात यासंबंधि बातमी देऊन देखील या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वरणगावात वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटेल ? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

काही वर्षांपूर्वी बस स्थानक येथील चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र, जसेजसे दिवस उलटत गेले, पुन्हा अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली. वाहनांची बेशिस्त पार्किंग, हातगाडी वाटेल त्या ठिकाणी उभी करणे, दुकानासमोर भाजी विकण्यास बसने, या सर्वांमुळे दिवसातून २ वेळेस वाहतूक कोंडी होत असते. शाळा, महाविद्यालये देखील या रस्त्यावर असल्या कारणाने जीव मुठीत घेऊन यावरून जावे लागते. या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून दुभाजक टाकण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचे
शहराचा मुख्य रस्ता असलेल्या रामपेठ चौकापासून ते रेल्वे स्टेशन दरम्यान पक्क्या दुकानातील वस्तू दुकानाबाहेर आणून ठेवल्या जातात. याला आळा घालणे गरजेचे आहे. भाजीपाला विक्रेत्यांना योग्य ती जागा देणे गरजेचं आहे. वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था असणे तेवढेच मह्त्वाचे आहे. सोबतच रस्त्यावर बेशिस्त वाहन उभे करणाऱ्यास दंड ठोठावणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.