सहाय्यक वनसंरक्षक हड़पेना खा. रक्षा खडसेनी खडसावले !

0

अवैध वृक्ष तोडीला तूमचे संरक्षण आहे का?

चोपडा ;- चोपड़ा तालुक्यात गेल्या वर्षभरापासून बिनधास्त सुरु असलेली हिरव्या गार वृक्षाची कत्तल सुरु असुन दररोज शेकडो मोठमोठी वृक्ष कत्तल केली जातात.सर्वसाधारण माणसाचे लक्ष्य जाते,पण ज्यांच्यावर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी आहे,ज्यानी जंगल सांभाळले पाहीजे जे लाखो रुपये पगार घेतात,शासकीय सुख सुविधा घेतात,अश्य्या वन कर्मचार्याना अधिकाऱ्यांना जंगल तोड़ दिसत नसेल का? आणि दिसत असेल तर मग कार्यवाई का करत नाहीत.असा प्रश्न सर्वाना पडतो.

चोपड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार रक्षा खडसे यांनी वृक्ष तोड़ करण्यासाठी तूमचे समर्थन आहे का.?असा सवाल सहायक वनसंरक्षक प्रथमेश हड़पे यांना केला,तूमचे व जंगल तोड़, वृक्ष तोड़ करणाऱ्या लोकांना तुम्ही पाठीशी का घालतात,तुम्ही जर वृक्ष तोड बंद नाही केली,लक्ष्य नाही दिले तर मी आंदोलन करेल,असा दम खासदार रक्षाताई खडसे यांनी भरला.

काही व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावूंन शेतकऱ्यांना आमिष देवून,बांधावर असलेल्या हिरव्यागार झाडाच्या बुंध्याला आग लावून त्याला पाड़ले जाते,व दुसऱ्यां दिवशी व्यापाऱ्याला दिले जाते.असा ही प्रकार वाढला असुन शेतकरी बांधवाने ही आमिषाला बळी पडू नये.म्हणून जनजागरण होण् ही गरजेचे असुन यावर कोणीच लक्ष्य देत नाही.

खासदार खडसे यांनी प्रथमेश हड़पे यांची तक्रार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे मोबाइल द्वारे केली. बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी वन विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी एकत्रित येवून अवैध वृक्ष तोड़ करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.