वंदे भारत एक्स्प्रेसची नंदीला धडक, अपघातामुळे इंजिनचा पुढील भाग तुटला

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भोपाळहून दिल्लीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस (20171) अपघाताची शिकार झाली आहे. ग्वाल्हेरहून मुरैना येथे येत असताना नंदीला ट्रेन धडकली. मुरैना येथील शिकारपूर रेल्वे फाटकावरील खांब क्रमांक 1226 च्या खांब क्रमांक 25 वर हा अपघात झाला. टक्कर इतकी जोरदार होती की इंजिनच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.

ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप

सुदैवाने ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अपघातानंतर ट्रेन सुमारे 10 मिनिटे उभी होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करून गाडी पुढे रवाना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.