मांडळ येथील युवकाच्या अंगावरून वाळूचे ट्रॅक्टर गेल्याने मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तरूणा शेतकऱ्याच्या अंगावरून वाळूचे ट्रॅक्टर चालवल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे आज १७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यावेळी दोषींवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) रा.भाल्या नाला परिसर, मांडळ असे मृत तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील जयवंत कोळी हे आपल्या कुरुंबियांसोबत राहत असून मंगळवार १७ जानेवारी रेाजी सकाळी ७ वाजता जयवंत कोळी हा शेतात पाणी भरण्यासाठी जात होता. त्यावेळी समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने आल्याने जयवंतला जोरदार धडक दिली. या अपघातात जयवंतच्या अंगावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे नेल्यावर थोड्या वेळातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी जयवंत कोळी यांनी अवैध वाळू वाहतूकदारांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वाद निर्माण झाले होते. तक्रारी करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने जयवंतचा जीव गेल्याची तालुक्यात चर्चा आहे. दरम्यान मयत जयवंत कोळी यांच्या पत्नी यांनी आरोपींचे नावे पोलिसांसमोर स्पष्ट केली आहे. जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले .

Leave A Reply

Your email address will not be published.