महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकाला एक वर्षांची शिक्षा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी जितेंद्र मांडळकर याला १ वर्षाच्या शिक्षेसह पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बोदवड शहरातील एका ४५ वर्षाच्या महिलेने बोदवड पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यात या महिलेचा नातेवाईक जितेंद्र मांडळकर याने दिनांक १८/०९/२०१७ रोजी न.ह. राका हायस्कूलच्या आवारात वाईट शेरेबाजी करत त्या महिलेचा विनयभंग केला होता अशी तक्रार दिली होती.

या अनुषंगाने आरोपीविरूद्ध भा.दं,वि कलम ३५४ ड प्रमाणे बोदवड पो .स्टे ला गुन्हा दाखल झाला होता. सदर खटल्याची सुनावणी बोदवड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात झाली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश क्यु.ए.एन. सरवरी यांनी आरोपीला भादंवी कलम ३५४ ड प्रमाणे दोषी ठरवून १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व रू ५००० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडातील रकमेपैकी रू ३००० फिर्यादीस देण्याचा आदेश न्यायालयाने आज पारीत केला.

या खटल्याचे कामकाज विशेष सहायक सरकारी अभियोक्ता संतोषकुमार कलंत्री यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो.ना. राजेश महाजन यांनी मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.