ठाकरे गटाचा जिल्हा उपनिबंधकांना घेराव घालण्यासाठी मोर्चा…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

नुकतीच पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पार पडली. या निवडणुकीच्या निकालाच्या वेळी तीन जागांच्या बाबतीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सदोष व राजकीय दबावात कामकाज केले व विद्यमान आमदारांच्या पॅनलला सहाय्य करीत काही निकाल जाहीर केले. त्याच्या विरोधात मा. जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे इलेक्शन पिटीशन दाखल केलेले आहे. असे असतांना जिल्हा उपनिबंधकांनी त्यावर पक्षकारांना नोटीस देखील काढलेली नाही. मात्र आमदारांचे कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अपात्रता प्रकरणात मे. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असतांनाही तातडीने नोटीस काढुन तडकाफडकी आमच्या पॅनलचे उमेदवार उध्दव मराठे यांना अपात्र घोषित करण्यासाठी सलगच्या व जवळच्या तारखा देऊन पक्षपात करीत आहेत. अपात्रता अर्जावर पक्षाकारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा अवधी न देता घाईघाईत तारखा देऊन जिल्हा उपनिबंधक यांनी आपली सत्ताधाऱ्यांशी असलेली बांधीलकी जगाला दाखवुन दिलेली आहे.

नैसर्गिक न्यायतत्वाने न वागणाऱ्या जळगाव जिल्हा सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांचा जाहीर निषेध आम्ही करीत आहोत. तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दाखल असलेल्या इतर तक्रारी व त्याचे चौकशीच्या प्रकरणात अद्याप चौकशी न करता प्रकरणे प्रलंबीत ठेवलेली आहेत. अपात्रता अर्जावर पक्षाकारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा अवधी न देता जवळच्या तारखा देणारे जिल्हा उपनिबंधक यांची सत्ताधाऱ्यांशी बांधीलकी दर्शविते. नैसर्गिक न्यायतत्वाने न वागणाऱ्या जळगाव जिल्हा सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक बिडवाई यांचा जाहीर निषेध करीत आहोत. तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दाखल असलेल्या इतर तक्रारी व त्याचे चौकशीच्या प्रकरणात अद्याप चौकशी न करता प्रकरणे प्रलंबीत ठेवलेली आहेत. त्याची साधी चौकशी देखील त्यांनी केलेली नसून राजकीय दबावात पक्षपाती आणि पारदर्शक काम न करणारे जिल्हा उपनिबंधक बिडवाई यांची चौकशी करण्यात यावी. जिल्हा उपनिबंधक यांना घेराव घालण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.