‘हिट अँड रन’ कायद्याविरोधात वाहतूक संघटना आक्रमक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्र शासनाने ‘हिट अँड रन’ बील लोकसभेत सादर केले आहे. या कायद्याला खाजगी वाहतूक संघटनांचा कडाडून विरोध सुरु आहे. बिल रद्द करावे, या मागणीसाठी काली-पिवळी चालक-मालक संघटनेने ३ जानेवारीपर्यंत बंद पुकारला आहे. माळ वाहतूक संघटनेने सोमवारी बेमुदत बंदचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. केंद्र शाहसनाने हिट अँड रन बिल सादर केले आहे. यात अपघात झाल्यास वाहन चालकाला शिक्षा तसेच दंड अशी तरतूद आहे.

त्यामुळे वाहन चालकांकडून या कायद्याला विरोध होत आहे. जिल्ह्यातील खाजगी वाहनचालक संघटनांनी हे बिल पार्ट घ्यावे, अशी मागणी आहे. यासाठी जिल्हाभरातील खाजगी वाहनचालकांनी आंदोलन पुकारले आहे. वाहनचालकांनी कामबंद आंदोलन केल्याने खाजगी ट्रॅव्हल्स तसेच काळी-पिवळी व इतर वाहने उभी होती. त्यामुळे याचा परिणाम नागरिकांवर झाला आहे. ट्रॅव्हल्स, मिनी ट्रान्स्पोर्ट वाहनचालक संघटना तसेच काळ-पिवळी संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. काली-पिवळी संघटनेने १ ते ३ जानेवारी दरम्यान वाहने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिनी ट्रान्सपोर्ट संघटनेनेही तीन जानेवारी पासून, बेमुदत कामबंदचा इशारा दिला आहे. यावेळी मिनी ट्रक माल वाहतूक संघटनेचे ज्ञानेश्वर इंगळे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी, सतीश जवके, रमेश केदार, जरार खान, अवधूत तंबाखे, सचिन रोडे यांच्यासह काली-पिवळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.