सिंधी समाज वधु-वर परिचयाचा आदर्श उपक्रम

0

लोकशाही संपादकीय लेख

अलीकडे सर्वच समाजात विवाहाची समस्या भेडसावत असल्याने समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावे घेतले जात आहेत. अशा परिचय मेळाव्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात विभागाची समस्या सुटण्यास मदत झाली आहे. असे वधू वर परिचय मेळावे समाजातील मान्यवरांच्या संघटनांतर्फे आयोजित केले जात असल्याने समाजाची मान्यता मिळून समाजाचे नैतिक बंधन प्राप्त होते. असे मेळावे तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा मोठ्या शहरात आयोजित होत असलेले आपण पाहतो, वाचतो.. परंतु भारतातील सिंधी समाजाने त्यावर मात करून आधुनिक युगातील तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन देशपातळीवर ऑनलाइन झूम ॲपवर वधु वर परिचय मेळावा घेऊन सर्वच समाजासमोर वधु वर परिचय मेळावा ऑनलाईनचा आदर्श उपक्रम ठेवला आहे. देशातील भारतीय सिंधी संगम या संघटनेच्या दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी आयोजित या मेळाव्यात १५० ते २०० वधू-वरांनी सहभाग घेऊन आपला परिचय करून दिला. दुपारी चार ते रात्री नऊ म्हणजे तब्बल पाच तास झालेल्या या वधु वर परिचय मेळाव्यात भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही सिंधी समाजातील वधू-वरांनी सहभाग घेतला, हे विशेष होय. अशा पद्धतीने ऑनलाईन मिळावा आयोजित करण्याचे श्रेय भारतीय सिंधी संगम या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जाते.

सदर ऑनलाईन मिळावा आयोजित करण्यासाठी सिंधी संगम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. या वधु वर परिचय मेळाव्यात सिंधी समाजातील व्यापारी वर्गातील वधू वरांनी तसेच सिंधी समाजातील डॉक्टर, वकील, सीए, कंपनीचे एमडी, शिक्षक, प्राध्यापक, उद्योगपती आदींचा समावेश असल्याने प्रत्यक्ष मेळावा एका ठिकाणी घेतला असता तर एवढी नामांकित मंडळी एकत्र येणे शक्य नव्हते. ऑनलाईन झूम मेळाव्यामुळे त्यांना या वधू वर परिचय प्रसंगी सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आयोजित केलेल्या या मेळाव्यामुळे वेळेची बचत होऊन अपव्य टाळता आला. मेळाव्यासाठी लागणारा मोठा आर्थिक खर्च कमी झाला. ऑनलाईन मेळाव्यामुळे स्थानिक पातळीवर व्यक्तिगत होणारे श्रम, दगदग टाळता आली. भारताच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मैलावरून प्रवास करून येणे, ही दगदग वाचली. विदेशातील बंधू-भगिनींना देशातील आपल्या घरातून या वधु वर परिचय मेळाव्यात सहभाग घेऊन आनंद लुटता आला. सिंधी समाज हा व्यापारी समाज म्हणून ओळखला जातो. पैशाचे मोल सिंधी व्यापाऱ्यांना जास्त कळते. सिंधी समाज आर्थिक दृष्ट्या कफल्लक आहे, अशातला प्रकार नाही. त्यांच्याकडे पैसा अडका असला तरी त्याचा उपयोग कशा पद्धतीने, काटकसरीने करावा याची त्यांच्याकडे अक्कल आहे. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून ते जे शक्य झाले नसते ते कमी खर्चात अथवा नगण्य खर्चात फार मोठे यश प्राप्त केले आहे. त्यांची व्यापारी वृत्ती इतर समाजाने घेऊन आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पैशाची तर फार मोठ्या बचतीबरोबर वेळेची फार मोठी बचत या ऑनलाइन मेळाव्यामुळे झाली. कारण वेळेचे मोल सिंधी समाजातील व्यापारी जाणतो. वेळ बचतीचा आदर्श ही या ऑनलाइन मेळाव्यातून घेण्यासारखा आहे.

वधु वर परिचय मेळाव्यात मेळाव्याच्या माध्यमातून दुसऱ्या समाजाची तुलना करणाऱ्याचा या लिखाणा मागचा उद्देश नाही. कुण्या समाजाला कमी लेखण्याचा आमचा हेतू नाही. तथापि जे जे उत्तम ते ते घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर आपण व्यक्तिशः आणि समाजाच्या रूपाने प्रगती गाठणे शक्य होते. म्हणून भारतीय संधी संगम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांना धन्यवाद दिल पाहिजे, त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. कारण देशात नव्हे तर जगात ऑनलाइन झूम पद्धतीने वधु वर परिचय मेळावा आयोजित करून त्यांनी बाजी मारली आहे. स्वाभाविक पाहता एका हॉलमध्ये वधु वर परिचय मेळावा आणि ऑनलाइन अशी तुलना यापुढे होत राहील, एवढे मात्र निश्चित. या मेळाव्याच्या विशेष यशाचे श्रेय मात्र भारतीय सिंधी संगम संघटनेकडे जाईल. सदर ऑनलाईन वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्यात भारतीय सिंधी संगमचे संरक्षक डॉ, बंसीलाल दर्रा कोटा, राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश अठवानी लखनऊ, पारस असरानी मंडला, राष्ट्रीय उपाध्यक्ष अमरदास खट्टर रायपुर, सुखदेव गिडवानी, राष्ट्रीय महासचिव राजगोपाल खट्टर, राष्ट्रीय महिला सचिव पूनम लखमानी लखनऊ, राष्ट्रीय सल्लागार डॉ मनोहर लाहेजा छत्तीसगढ़, हरीश गोलानी उदयपुर, हीरल कवलानी नोएडा, प्रकाश वाधवा रायपुर, दीप्ति मूलचंदानी लखनऊ, जगदीश शहदादपुरी अहमदाबाद, मीना शहदादपुरी, सतीश कुकरेजा, सि ए, चेतन तारवानी रायपुर, मनीषा तारवानी रायपुर, अखंड सिंधी सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुरली गुरदासानी जळगांव, भूमि कृपलानी, जयपुर जूम लिंक संचालन व फेसबुक लाइव कर्ता जयप्रकाश बेलानी आणि दैनिक लोकशाहीचे पारोळा येथील प्रतिनिधी पत्रकार अशोक कुमार ललवाणी, प्रसिद्धी प्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना सिंधी समाजाच्या अनेकांचे सहकार्य लाभले. या ऑनलाइन मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन मिळाव्यात भाग घेतलेल्या आणि आपला परिचय करून दिलेल्या सर्व वधू-वरांचा व्हिडिओ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे उपलब्ध असून त्यांचा बायोडेटा सुद्धा कोणत्याही वेळी पाहता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगात पहिल्यांदा ऑनलाईन झूम वधू वर परिचय मेळावा आयोजित केल्याबद्दल भारतीय सिंधी संगम संघटना अभिनंदनास पात्र आहे. इतरांनीही असे पाऊल टाकल्यास वेळ पैसा आणि आदींची बचत होईल एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.