“मी जे परिधान करते त्यामुळे भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागते”; उर्फी जावेद

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

उर्फी जावेद (Urfi Javed) हे नाव आज घराघरात पोचला आहे. कारण काई तर तिच्या फॅशन सेन्स मुळे, हटके स्टाईल, स्वतःचे मत असलेली उर्फी ट्रोल ही तेवढीच झाली. आता तीने चक्क एक ट्विट केलं असून, सर्वच जणांना आशचर्य चकित केले आहे. उर्फी जावेद तिच्या आउट ऑफ द बॉक्स फॅशनसाठी ओळखली जाते. यापूर्वी ती फक्त विचित्र कपडे परिधान करून इंस्टाग्रामवर शेअर करायची. ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT)ने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. ती फक्त आठवडाभर राहिली पण बाहेर आल्यावर ती स्टार झाली. आता ती मोठ्या फॅशन डिझायनर्ससोबत काम करत आहे. रणवीर सिंग ते करीना कपूर यांनी तिचे कौतुक केले आहे. उर्फीला शुक्रवारी तिने एक ट्विट करून नेटकऱ्यांना चकित केले.

उर्फीच्या या ट्विटमुळे तिच्या चाहत्यांनी कमेंट करुन चौकशी करण्यास सुरूवात केली. उर्फी ट्विटमध्ये म्हणाली की, मी ज्या प्रकारचे कपडे परिधान करते त्याबद्दल मी माफी मागते आणि आतापासून बदलेन, असं तिने म्हटले आहे. उर्फीला तिच्या वेगळ्या फॅशनची ओळख मिळाली आहे, त्यामुळे तिने असे ट्विट केले तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘मी जे परिधान करते त्यामुळे भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागते. आतापासून तुम्हांला बदललेली उर्फी दिसेल. कपडे बदलले. क्षमा करा, असंही तिने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.