मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी !

अभिनेते परेश रावल यांचे परखड मत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संथ गतीने झाले. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध नसल्याने, तसेच ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. या समस्यांचा सामना करत अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच इतरांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी मतदान न करणाऱ्यांबाबत परखड मत मांडले आहे.

परेश रावल यांनी स्वतः मतदान केल्यानंतर इतर मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “जे लोक मतदान करत नाहीत आणि नंतर तक्रार करतात की सरकार हे करत नाही, ते करत नाही. तेव्हा सरकार नाही तर ते लोक जबाबदार असतात, कारण त्यांनी मतदान केले नाही. मतदान न करणाऱ्यांसाठी काही तरतुदी असायला हव्यात, जसे की कर वाढवणे किंवा काही अन्य शिक्षा”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.