राणेंना महाविकास आघाडीतून छुपा पाठिंबा ?

0

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांनी महाविकास आघाडीचे विद्यमान उमेदवार खासदार विनायक राऊत त्यांच्यासमोर मोठे तगडे आव्हान उभे केले होते. असे सांगतानाच काही महाविकासआघाडीच्या नेते मंडळींनीही राणे यांना अंतर्गत सपोर्ट केल्याची चर्चा व काही माहिती असल्याचा गौप्यस्फोट स्थानिक पत्रकारांनी केला आहे.

सुरुवातीला विनायक राऊत यांना ही सोपी वाटणारी निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून निवडणुकीच्या आधी दोन तीन दिवस वातावरण एकदम बदलल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे जो कोणी उमेदवार निवडून येईल तो काही हजारांच्या फरकात असेल असेही मत या चर्चासत्रात सहभागी झालेल्या मान्यवर पत्रकारांनी व्यक्त केले आहे. कोकणाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृह झालेल्या चर्चासत्रात जेष्ठ पत्रकार सतीश कदम, समीर जाधव, योगेश बांडागळे, महेंद्र कासेकर आणि विश्लेषक अभय अंतरकर यांनी सहभाग घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.