इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिराच्या अतिक्रमणावर हातोडा !

0

इंदोर , लोकशाही न्यूज नेटवर्क

इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीला झालेली दुर्घटना आजही लोक विसरू शकलेले नाहीत. रामनवमीच्या दिवशी मंदिरात असलेलं विहिरीचं छत कोसळून ३६ लोकांचा मृत्यू झाला. त्याच मंदिरावर आज बुलडोझर चालवण्यात आला. या मंदिराच्या शेजारी असलेलं सगळं अतिक्रमण हटवण्यास सुरूवात झाली. इंदूरमध्ये सकाळपासूनच या कारवाईची चर्चा आहे.

३० मार्चच्या दिवशी रामनवमीचा उत्सव इंदूरमध्ये सुरू होता. त्यावेळी या मंदिरात असलेल्या विहिरीचं छत कोसळलं आणि या घटनेत ३६ भाविकांचा मृत्यू झाला. यानंतर आज या ठिकाणी जे जे अवैध बांधकाम आहे ते तोडण्यासाठी आणि अतिक्रमण हटवण्यासाठी नगर पालिकेचे कर्मचारी बुलडोझर घेऊन आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही तैनात करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.