गद्दारांना मातीत गाडा; बुलढाण्यात उध्दव ठाकरेंचे आवाहन…

0

 

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची रविवारी शहरात जंगी सभा पार पडली. सभेला उपस्थित असलेल्या भव्य जनसमुदायाला त्यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहताच बुलडाण्यातील राजकीय समीकरण बदलुन महायुतीचे अस्तित्व धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.

मुळ शिवसेनेत 3 वेळा आमदार, 3 वेळा खासदार व मंत्रीपद भोगलेले खासदार प्रतापराव जाधव शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गटात आले. त्यामुळे त्यांना महायुतीकडून चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक पाहता त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये याबाबत काही भाजपा नेत्यांची व कार्यकर्त्यांची सुरूवातीपासूनच मागणी होती. परंतु तरीही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच मागील खासदारकीच्या 15 वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात असे कोणतेही शाश्वत विकास कार्य केल्याचे दिसत नाही. त्यामुळे यापुढे त्यांच्याकडून विकासाची काय अपेक्षा करावी? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात असून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून प्रतापराव जाधव यांना नाहीतर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मते मागितली जात आहेत. एवढा आटापिटा होत असतांनाच रविवारी उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेने कहर केल्याने बुलडाण्यात महायुतीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. सभेत उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकारवरही हल्लाबोल केला. त्यापेक्षा शिवसेना सोडून गेलेल्यांना ज्यामध्ये जाधव यांचाही समावेश आहे, अशा गद्दारांना याच मातीत गाडण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित जनतेतून टाळ्यांच्या कडकडाटात व आरडाओरड करून उस्फुर्त मिळाल्याचे दिसून येत आहे. यामुळे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.