युवकांचे मानसशास्त्र.. बुद्धिमत्ता (भाग दोन)

0

लोकशाही विशेष लेख

बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार हे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. त्यात जसजसे संशोधन होत आहे, तसतसे त्यांच्या नवनवीन प्रकारा देखील समोर येत आहे.

१)शैक्षणिक बुद्धिमत्ता: ही बुद्धिमत्ता शैक्षणिक उपलब्धतेशी संबंधित आहे.

२)भावनिक बुद्धिमत्ता: भावनिक बुद्धिमत्तेच्या बाबतीत डॅनियल गोलमन यांचे कार्य खूप उल्लेखनीय मानले जाते. व्यक्तीच्या कामातील यशापैकी 80 ते९० टक्के यश हे भावनिक बुद्धिमत्तेमुळेच प्राप्त होते. असे म्हणतात आयक्यू नोकरी देतो, पण प्रमोशन इ.क्यू देतो.

३)आत्मिक बुद्धिमत्ता : मूल्य आणि अर्थ यांच्याशी निगडित समस्या सोडवण्यासाठी वापरली जाणारी बुद्धी म्हणजे अध्यात्मिक बुद्धी होय.

४)गती कुशल बुद्धिमत्ता:ज्या व्यक्ती आपल्या शारीरिक अवयवांचा उपयोग आपल्या कार्यामध्ये उत्कृष्ट प्रकारे करून घेतात त्या व्यक्ती कुशलता स्नायू
विषयक बुद्धिमत्तेत प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ खेळ खेळणारे खेळाडू, नर्तक, अभिनेते, सर्कशीत काम करणारे लोक.

५)कृत्रिम बुद्धिमत्ता: म्हणजे रोबोट कॉम्पुटर यु .एफ.ओ. सॅटॅलाइट.

६)सामाजिक बुद्धिमत्ता: सामाजिक बुद्धिमत्ता ही दोन पेक्षा अधिक व्यक्तींमधील परस्पर अंतरक्रिया आहे. त्यात समूह गट देखील असतात या आंतरक्रिया मधून परिणामकारक रित्या किंवा प्रभावीपणे कार्य करण्याची व्यक्तीची कुवत म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय.

यशस्वी आणि प्रभावी नेत्यांमध्ये या प्रकारच्या सर्व प्रकारात मोडणाऱ्या बुद्धिमत्तेचा उच्च कोटीचा असा लयबद्ध ताड मेड असतो. म्हणूनच तो प्रभावी नेता हा ठरतो. आणि जनता अशा प्रकारच्या नेत्याला एक ना अनेकदा त्यांचा नेता त्यांचा मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती म्हणून निवडून देतात. या ठिकाणी प्रामुख्याने लेखक हा मानसशास्त्रज्ञ म्हणून बुद्धिमत्तेचा नपुसक बुद्धिमत्ता हा नवीन प्रकार संशोधित करून समाजासमोर लोक शिक्षणासाठी समोर आणत आहे.

नपुसक बुद्धिमत्ता म्हणजे एका शब्दात सांगायचे झाले तर गुलामगिरी होय. निमुटपणे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, सहन करणे. नपुसक बुद्धिमत्तेचा संबंध हा रक्ताशी आहे. कारण इंटेलिजंट कोशन रक्तपेशींचा असतो. व्यक्तीच्या शरीरात फक्त रक्त हाच घटक जिवंत राहतो. रक्त शरीरातू पूर्ण निघाल्यावर व्यक्तीचा फक्त सांगाडा शिल्लक राहतो. तो सुद्धा ठराविक वेळेनंतर कुजतो, सडतो. ज्या व्यक्तीच रक्त थंड असतं, त्या व्यक्तींमध्ये नपुसक बुद्धिमत्तेचं प्रमाण अधिक असतं. जनक्रांतीसाठी सामाजिक गरम युवा उकळत्या रक्त असणाऱ्या आपल्यासारख्या युवकांची नेत्यांची आवश्यकता आहे.

बुद्धिमत्तेच्या बाबतीत बोलायचे झाले तर संशोधनानुसार कुठल्याही व्यक्तीचा बुद्धिमत्ता हा घटक त्याच्या आईच्या दुधात असणाऱ्या डी. एच. ए. या घटकावर निर्धारित असतो. बुद्धीचा संबंध हा आई पाजत असणाऱ्या त्याच्या बाळाला तिच्या दुधाशी असतो. दुर्दैवाने आज समाजात प्रतिनिधिक स्वरूपात महाराज माता जिजाआई सारख्या राजमातांची मुळातून कमतरता आहे. ज्या बाळाला आईचे दूध मिळत नाही किंवा जन्मजात त्याची आई नसते, अशांना प्रामुख्याने गायीचे, शेळी, मेंढी आणि गधडीचे दूध दिले जाते.

मानसशास्त्रज्ञ म्हणून लेखक असे नमूद करतात की, व्यक्तीचा बुद्धिगुणांक पेक्षा झाडांचे औषध वनस्पतींचे बुद्धिगुणांक हा काही वेळेला सरस ठरतो. म्हणूनच या वनस्पती झाडे फुले व्यक्तीच्या आजारावर अचूकपणे निदान करतात. ज्या मुलांची बुद्धी लहानपणी थोडी कमकुवत असते त्यांना अक्कलतारा हा खायला देतात. व्यक्तीची बुद्धी ही प्रामुख्याने प्राणायाम, योग अभ्यास, व्यायाम, मेडिटेशन, त्राटक आणि शाकाहाराने प्रभावित होते.

झाडा फुलांची प्राण्यांची बुद्धिमत्ता ही सरस असल्या कारणामुळेच पार पूर्वकाळापासून देवी देवतांचे वाहन म्हणून प्राणी पक्षी हे आहे. वनस्पती वृक्षांवर पुराणानुसार देवतांचा रहिवास आहे. जगामध्ये प्राणी पक्षांचा वापर हा सिक्युरिटी आणि युद्धासाठी केला आहे. त्यात बदक, कोंबडा, कबूतर, हत्ती घोडे, गाई, म्हशी, गाढव यासारख्या सर्व प्रकारच्या प्राणी पक्षांचा समावेश होतो. रामायण काळात खारुताई आणि वांदरांनी मिळून राम सेतू पूल बांधला असल्याचा संदर्भ आहे.

प्राणी हे माणसाला मदत करतात शिकवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याची घोड्याची समाधी बनवली. तर जगविख्यात योद्धा महाराणा प्रताप यांनी आपल्या चेतक घोड्याचे मंदिर बनवले. असे कितीतरी उदाहरणे देता येतील. या तंत्रज्ञानाच्या युगात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच लवकर ऐकत नाही, मात्र पाळीव प्राणी माणसाळलेले जनावरे मात्र एखाद्या व्यक्तीच्या आज्ञाचे अत्यंत निमुट पणे पालन करतात. त्यात झाडे, फुले, फळे देखील असतात. समाजानेच आता आत्मचिंतन करत ठरवायचे की, या प्रकाराला काय म्हणायचे? आणि आपली बुद्धिमत्ता, आपला नेता हा कसा असावा भ्रष्टाचारी का सदाचारी?

बुद्धिमत्तेतील स्मृती पेशी सातत्याने प्राणायाम, योग अभ्यास आणि मेडिटेशन केल्यामुळे पुनर उपजीवित होता. त्या कारणामुळे व्यक्तीला काही वेळेला मागील जन्माच्या गोष्टी या आठवायला लागतात यामुळे बुद्धिमत्ता स्मृतीही सुधारते.

प्रा. डॉ. आशिष सुभाष जाधव/ बडगुजर
हॅपी मिरर रिसर्च अँड मल्टीपर्पज फाउंडेशन
जळगाव. ९३७३६८१३७६

Leave A Reply

Your email address will not be published.