उत्तराखंडच्या टनेलमध्ये अडकलेल्या मजुरांची अवस्था बिकट

0

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तराखंमधील उत्तरकाशी शहरामध्ये निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार आतमध्ये अडकले आहेत. उत्तराखंड टनेल कोलॅप्स बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने रविवारी रात्री उशिरा रस्त्याचे बांधकाम थांबवल आहे. उत्तरकाशीमध्ये १२ नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर ४१ कामगार अडकलेले आहेत.

१९२ तासांनंतरही बचावकार्य सुरूच आहे. आज बचावकार्याचा ९ वा दिवस असून कामगारांना बाहेर काढण्याची शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रास्ता तयार करतांना बोगद्यात कंपन झाल्याचं समोर आलं आहे. सुमारे १०० मीटर रस्त्याचे काम अद्याप बाकी आहे. बोगद्याच्या आत कामगारांसाठी 125 मिमी पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. रात्री उशिरा हा पाइप ५७ मीटरपर्यंत टाकण्यात आला.

आता पंतप्रधान कार्यालयाने चार ठिकाणी बचाव कार्य चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगद्यात सुमारे ६० मीटरचा रस्ता बनवायचा आहे. यामध्ये, एक SJVNL बोगद्याच्या वर, ONGC बोगद्यात तिरपे मार्ग बनवत आहे आणि THDCIL बोगद्याच्या दुसऱ्या टोकापासून मार्ग काढत आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.