आश्चर्यच..! ट्रान्सजेंडर पुरुष गर्भवती, मार्चमध्ये देणार मुलाला जन्म

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात पहिल्यांदाच एक आश्चर्यचकित घटना घडली आहे. केरळच्या कोझिकोडमधील एक ट्रान्सजेंडर कपल आई-वडील बनणार असून ते मार्चमध्ये एका मुलाला जन्म देणार असल्याची घोषणा केली आहे. एक ट्रान्सजेंडर व्यक्ती बाळंत होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

3 वर्षांपासून सोबत

3 वर्षांपासून जिहाद व जिया पावल सोबत राहतात. जिया पावल एक डांसर आहे. ती पुरुष म्हणून जन्माला आली व एका महिलेत तिचे रुपांतर झाले. तर जहाद एक महिला म्हणून जन्माला आली आणि नंतर ती पुरुष झाली. जहादने गरोदर होण्यासाठी स्वतःची ट्राझिशनिंग प्रोसेस बंद केली आहे.

कुणीतरी आई म्हणावे..

जियाने इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. ती म्हटली की, ‘आम्ही आई बनण्याचे माझे व वडील बनण्याचे माझ्या पार्टनरचे स्वप्न साकार करणार आहोत. 8 महिन्यांचा गर्भ आता जहादच्या पोटात आहे. मी जन्माने किंवा आपल्या शरीराने केव्हाच एक महिला नव्हते. पण आपल्याला कुणीतरी आई म्हणावे असे माझे स्वप्न होते. आम्ही एकत्र येऊन 3 वर्षे झालेत. माझ्या आई बनण्यासह जहादचे वडील बनण्याचे स्वप्न आहे. आज 8 महिन्यांचे जीवन त्याच्या मर्जीने त्याच्या पोटात वाढत आहे.’

कुटुंबासह डॉक्टरांचे आभार 

तसेच जियाने माहिती दिली की, आम्ही एकत्र राहण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्ही आमचे जीवन अन्य ट्रान्सजेंडर्सपेक्षा वेगळे असावे असा निश्चय केला. बहुतांश ट्रान्सजेंडर कपलचा समाज व त्यांचे कुटुंबीय बहिष्कार करतात. या जगातील आपले अस्तित्व संपल्यानंतरही आपले कुणीतरी असावे यासाठी आम्हाला एक मूल हवे होते. आम्ही बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेतला तेव्हा, जहादची ब्रेस्ट रिमूव्हल सर्जरी सुरू होती. आम्ही ती गरोदरपणासाठी थांबवली. जियाने आपल्या कुटुंबासह डॉक्टरांचे आभार मानले आहेत. जहाद मुलाला जन्म दिल्यानंतर पुरुष बनण्याची प्रोसेस पुन्हा सुरू करेल. जहादने दोन्ही स्तन काढून टाकल्याने आम्ही आमच्या बाळाला मेडिकल कॉलेजमध्ये मिळणारे ब्रेस्ट मिल्क बँकेतील दूध देण्याचा प्रयत्न करू.

सोशल मीडियावर शुभेच्छा

या जोडप्याच्या इंस्टाग्राम पोस्टला हजारो लाइक्स व कमेंट्स मिळाल्यात. अनेकजण त्यांना शुभेच्छाही देत आहेत. इंटरनेट युजर्स त्यांच्या उज्ज्वल भविष्याचीही कामना करत आहेत. एकजण म्हणाला -अभिनंदन. आज इंस्टाग्रामवर पाहिलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. निर्मळ प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते. तुम्हाला आणखी ताकद मिळो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.