बापरे ! चिमुकलीला 51 वेळा दिले लोखंडी सळईने चटके

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

समाज कितीही साक्षर झाला तरी अजूनही अनेक जण अंधश्रद्धेला बळी पडतात. अशी एक धक्कादायक घटना मध्यप्रदेशमधून समोर आली आहे. अंधश्रद्धेमुळे एका 3 महिन्यांच्या निरागस चिमुकलीचा बळी गेला आहे. न्यूमोनिया बरा करण्यासाठी या चिमुकलीला तब्बल 51 वेळा गरम लोखंडी सळईने चटके देण्यात आले.

मध्य प्रदेशातील शहडोल या आदिवासी जिल्ह्यात सिंगपूर कथोटिया येथे एका तीन महिन्यांच्या मुलीला न्यूमोनियामुळे श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने चिमुकलीच्या पालकांनी तिला चटके देण्याच्या प्रचलित कुप्रथेवर विश्वास ठेवत मुलीला एका झांडफूक करणा-याकडे नेले. तिथे या मुलीला झांडफूक करणा-याने गरम लोखंडी सळईने 51 वेळा चटके दिले. यामुळे मुलीची प्रकृती बिघडली. दरम्यान गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने कुटुंबीयांनी तिला शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये नेले. महिला व बालविकास अधिकारी रुग्णालयात गेले असता ही घटना 15 दिवस जुनी असल्याचे उघड झाले असून न्यूमोनियाचा संसर्ग वाढल्याने या चिमुकलीचा मृत्यू झाला.

शहाडोलच्या जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीच्या आईला एका अंगणवाडी सेविकेने मुलीच्या आईला दोनदा सल्ला दिला की तिला रुग्णालयात घेऊन जा, चटके देण्याच्या प्रचलित कुप्रथेला बळी पडू नका. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी तिला झांडफूक करणा-याकडे नेले. तिथे तिला एक दोनदा नव्हे तर तब्बल 51 वेळा दाग देण्यात आल्याने मुलीची प्रकृती प्रचंड ढासळली. दरम्यान कुटुंबीयांनी तिला शहडोलच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेले. मात्र श्वासाची तार तुटल्याने मुलीला वाचवता आले नाही. मुलीला महिला व बालविकास अधिकारी रुग्णालयात नेले असता मुलीला गरम लोखंडी सळईने दागण्याची घटना 15 दिवस जुनी असल्याचे आढळले. असे त्यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.